हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही - HINDU POST
Headlines News :

राष्ट्रीय

Latest Resource

Home » » हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही

हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:14 AM


स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर - लग्नसमारंभात मांडव आणि शामियाना उभारणारे आणि अन्य सेवा देणारे आता करापासून स्वत:ला वाचवू शकणार नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने, हिंदू विवाह समारंभ हे धार्मिक आयोजन नसल्याचे सांगून यावेळी मांडव आणि अन्य सेवा देणार्‍यांना सेवाकरातून सूट दिली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्र आणि न्या. संजीव खन्ना यांच्या न्यायासनाने ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायजेशनची याचिका फेटाळून लावीत हा निकाल दिला. या ऑर्गनायजेशनने म्हटले होते की, लग्नसमारंभ हे धार्मिक आयोजन असल्याने यासाठी मांडव घालण्यासंदर्भात आपल्यावर सेवाकर लादला जाऊ नये. केवळ सेवाकर लावण्यासाठी याला सामाजिक कार्यक्रम म्हटले जाऊ शकत नाही.
न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि मांडव घालणार्‍यांना सेवाकरातून मुक्तता नाही, हेही स्पष्ट केले.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

Blogroll

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU POST - All Rights Reserved
Original Design by Creating Website Modified by Adiknya