जोहान्सबर्ग, २ ऑक्टोबर
altतिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला असून येत्या रविवारी डर्बन शहरात होणाऱ्या समारोहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार स्वीकारण्यासाठी दलाई लामा यांना दक्षिण आफ्रिका सरकारने व्हिसा मंजूर करावा, अशी विनंती महात्मा गांधी यांच्या नात ईला गांधी यांनी केली आहे. चीनच्या दबावामुळे दक्षिण आफ्रिका सरकार ७६ वर्षीय लामा यांना व्हिसा मंजूर करण्याची शक्यता सध्यातरी अंधुक आहे. दलाई लामांचा प्रस्तावित दक्षिण आफ्रिका दौरा त्यामुळे संकटात आला आहे.



0 comments:
Speak up your mind
Tell us what you're thinking... !