पाणी पिऊनही वजन कमी करणे शक्य - HINDU POST
Headlines News :

राष्ट्रीय

Latest Resource

Home » » पाणी पिऊनही वजन कमी करणे शक्य

पाणी पिऊनही वजन कमी करणे शक्य

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:07 AM

पाणी हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पाण्याअभावी शरीराची कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. तज्ज्ञांच्या मते, मानवी शरीर जेवण न करता काही दिवसांपर्यंत जिवंत राहू शकते; परंतु पाण्याविना जिवंत राहू शकत नाही. दररोजच्या वापरासोबतच वजन कमी करण्यासाठीही पाण्याची भूमिका महत्त्वाची आहे. कशी ते जाणून घेऊया..
मेटाबॉलिझम तीव्र होतो - र्जमनीमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार भरपूर पाणी पिल्याने शरीराची कॅलरी खर्च करण्याची क्षमता वाढते. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने मेटाबॉलिझम मंद होतो. यामुळे शरीरात फॅट वाढू लागतो. तज्ज्ञांच्या मते, दिवसभरात 500 मिली पाणी पाणी पिल्याने महिला व पुरुषांचा मेटाबॉलिक दर 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तथापि, महिला व पुरुषांच्या शरीरात हा दर वेगवेगळासुद्धा असू शकतो. कारण महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मेटाबॉलिझमची गती नैसर्गिकरीत्या तीव्र असते.
भुकेवर नियंत्रण - जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोटात जेवणासाठी कमी जागा वाचेल आणि लवकर पोट भरेल. एका संशोधनानुसार जे लोक जेवण करण्याच्या 20 ते 30 मिनिटे आधी दोन ग्लास पाणी पितात त्यांचे वजन पाणी न पिणार्‍यांच्या तुलनेत अधिक नियंत्रित राहते.
पचनास सोपे - शरीराची पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठीसुद्धा पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. यामुळे मलावरोध होण्याचा धोका नसतो आणि पोटही साफ राहते. या बाबी वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
व्यायाम करताना आवश्यक - अधिक पर्शिम किंवा व्यायाम करताना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे आवश्यक आहे. अशामध्ये शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे कार्यक्षमताही कमी होत जाते. व्यायाम करण्यापूर्वी, व्यायाम करताना आणि व्यायामानंतर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
वॉटर रिटेन्शनचा धोका नाही - जेवणामध्ये जास्त मिठाचा वापर केल्याने ही समस्या उद्भवते. यामुळे शरीरात पाणी वाढायला लागते. कारण किडनीची कार्यप्रणाली बाधित होते. याला शरीरात सूज येणे, असेही म्हणतात. अशा स्थितीत भरपूर पाणी पिऊन समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
क्लेंजिंग एजंट - शरीरातील विषारी पदार्थांपासून मुक्ती मिळवण्याची नैसर्गिक पद्धत म्हणजे पाणी होय. पाण्यात कॅलरी काहीच नसते. त्यामुळे जास्त पाणी पिल्याने शरीरासाठी फायदेशीरच आहे.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

Blogroll

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU POST - All Rights Reserved
Original Design by Creating Website Modified by Adiknya